आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते नूतन सरपंच संजय इंगोले यांचा सत्कार संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते संजय इंगोले यांची वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते सरपंच संजय इंगोले यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
व आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सरपंच संजय इंगोले यांना पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मोहन बापू आलदर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब मदने, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते उमेश (दादा) लवटे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अनिल पाटील, तात्यासाहेब मदने, ज्योतीराम शेटे, रणजित मदने इत्यादी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment