युवा नेते डॉ अनिकेतभैया देशमुख अडकले विवाहबंधनात.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
आजोबा 11वेळा आमदार भाऊ आमदार पण डॉ अनिकेत देशमुख यांनी केलं कोर्ट मॅरेज.
सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे नातू व सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉ अनिकेत भैय्या देशमुख यांनी बँडबाजा हारतुरे या खर्चास टाळून
त्यांनी धाराशिव तालुक्यातील पळसप येतील हणमंत लाखाड पाटील यांची सुकन्या डॉ आस्था दिनांक 6 जून रोजी दोघे विवाह बंधनात अडकले असून डॉ आस्था यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्रदान केलेली आहे.
त्या सध्या सोलापूर येथील वैशपायन मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरीस आहेत
डॉ अनिकेत भैया देशमुख व डॉ आस्था हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराणेशाहितील असून त्यांनी जात-पात धर्म न मानता माणूसपण जपण्याचे कार्य देशमुख घराण्यांनी केलेले असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
व तसेच युवा नेते डॉ अनिकेतभैय्या देशमुख व डॉ आस्था अनिकेत देशमुख या नव वधू-वरांना सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
लग्नात होणाऱ्या सगळ्या खर्चांना, झगमगाट अन् शाही मिरवणुकांना फाटा देऊन डॉ. अनिकेत देशमुख यांनी अत्यंत साधेपणाने धाराशिव तालुक्यातील पळशीप गावच्या कन्या डॉ. आस्था पाटील यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. एवढा मोठा राजकीय वारसा असलेली व्यक्ती अशा साध्यापद्धतीने लग्न करु शकते तर आपण का नाही? असाच सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.






No comments:
Post a Comment