वाकी शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मा अनिल कापसे तर व्हा चेअरमनपदी शामराव खिलारे यांची बिनविरोध निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या रिक्त असलेल्या जागेची निवड सोमवार दिनांक 9 /6/ 2025 रोजी घेण्यात आली.
या चेअरमन पदाच्या निवडीसाठी अनिल कापसे तर व्हा चेअरमन पदासाठी शामराव खिलारे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध जाहीर केली.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची जोरात आताषबाजी करत गुलालाची उधळण केली.
यावेळी नूतन चेअरमन अनिल कापसे व व्हा चेअरमन शामराव खिलारे यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वाकी शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. शेख यांनी काम पाहिले.
यावेळी शिवसेना तालुका उपाध्यक्ष संतोष रोकडे, अमोल पाटील, मधुकर सपाटे, धनंजय नरळे सर, ऋषिकेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील,अनिल जाधव, संजय जाधव, तुकाराम जाधव, श्रीकांत जाधव, शिवाजी साळुंखे, वसंत ढेंबरे, उद्धव शिंदे व असंख्य कार्यकर्ते व वाकी शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव शेळके व शिपाई विजय जावीर उपस्थित होते.



No comments:
Post a Comment