Recent Tube

Breaking

Thursday, May 29, 2025

बापूंचं काम बोलत राहणार!




 बापूंचं काम बोलत राहणार!


सांगोला / प्रतिनिधी “आमदार असो किंवा नसो, सांगोला तालुक्यासाठी मी कायम काम करत राहणार,” असे स्पष्ट शब्दांत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मा. शाहाजीबापू पाटील यांनी वारंवार सांगितले आहे. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी सांगोला बस स्थानकासाठी २० नव्या बसगाड्यांची मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.



या मागणीसंदर्भात शाहाजीबापूंनी स्वतः प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, सांगोला तालुक्यातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समोर मांडल्या. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.


त्या आश्वासनानुसार पहिल्या टप्प्यातील ५ आधुनिक बीएस-६ श्रेणीतील बसगाड्या उद्या सांगोला बस स्थानकात दाखल होणार आहेत. या बसगाड्या ASHOK LEYLAND कंपनीच्या असून, त्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायक होणार आहे.


या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना वेळेवर बससेवा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि महिला प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.


शहाजीबापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. "बापूंचं काम बोलतंय," हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment