आलदर हॉस्पिटल मध्ये 1 किलोच्या नवजात बालकाला कृत्रिम श्वसन प्रणालीद्वारे जीवदान.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील आलदर हॉस्पिटल येथे सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील केवळ 1 किलो वजन असलेल्या नवजात बालकाला यशस्वीरित्या कृत्रिम श्वसन प्रणालीच्या (व्हेंटिलेटर) मदतीने जीवदान देण्यात आले.
हे बाळ जन्माच्या वेळी नॉर्मल प्रसूतीनंतर श्वास घेण्यासाठी त्रास घेत होते. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपाययोजना करत त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यानंतर 3 दिवसांनी बाळाच्या श्वसन प्रक्रियेत सुधारणा दिसून आल्याने व्हेंटिलेटर काढण्यात आले. यानंतर काही दिवस त्याला नॉर्मल ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. बाळाची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले.
चौदा दिवसांनी बालकाला आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून बालकांचे सर्व उपचार मोफत करण्यात आले.
डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला. नातेवाईकांना औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.
तरी सर्व गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment