रमाई आवास योजना समितीमधील समुदाय संघटक व म.न.पा. चा टेक्निकल विभाग चुकीच्या पध्दतीने काम करत असलेबाबत..
बुधवार पेठ परिसरातील पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी विविध कामे करणेबाबत सो.म.पा.मा.आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी निवेदन दिले
सोलापूर- सो.म.पा. जनता दरबार येथे सो.म.पा.मा.आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी रमाई आवास योजना समितीमधील समुदाय संघटक व म.न.पा. चा टेक्निकल विभाग चुकीच्या पध्दतीने काम करत असलेबाबत..
सो.म. पा.प्रभाग क्रमांक 5 परिसरातील पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी विविध कामे करणेबाबत निवेदन दिले.
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 परिसरातील थोरला राजवाडा ,मिलिंद नगर, बुधवार पेठ परिसरातील नागरिक ब्रिटिशकालीन 200 वर्षांपूर्वीचे अनुसूचित जातीतील नागरिक आहेत. थोरला राजवाडा म्हणून ओळखले जाते .त्याचप्रमाणे 26 व 27 नोव्हेंबर 1927 या कालावधीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 दिवशीय ऐतिहासिक महार वतनदार परिषद भरवली होती. या परिसरात काही ठिकाणी लाभार्थ्यांचे जागेचे 7/12 उतारे आहेत .तसेच काही लाभार्थ्यांना सो.म.पा.कडून फार वर्षांपूर्वी जागा प्राप्त झालेला आहे. सदर परिसर झोपडपट्टी भाग म्हणून मनापासून घोषित केलेला आहे त्याचप्रमाणे जय मल्हार चौक ,बुधवार पेठ हा परिसर सुद्धा झोपडपट्टी भाग म्हणून मनापासून केलेला आहे .
तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर ,मातंग वस्ती हे 1967 साली महानगरपालिकेकडून लिलाव पद्धतीने जागेची विक्री करून वैयक्तिकरित्या जागेचा कब्जा त्या परिसरातील नागरिकांना देण्यात आला.
तरी काही महानगरपालिकेचे अधिकारी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर मातंग वस्ती छोला राजवाडा मिलिंद नगर झोपडपट्टी खाजगी आहे असे रमाई आवास योजना समितीमधील समुदाय संघटक यांना सांगितल्याने रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत लाभार्थी लाभापासून वंचित आहेत खाजगी झोपडपट्टी नसताना सुद्धा रमाई आवास योजने योजना समितीमधील समुदाय संघटक चुकीची माहिती देत आहेत सोला राजवाडा मिलिंद नगर, बुधवार पेठ व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती, बुधवार पेठ या परिसरातील नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभापासून वंचित ठेवत आहेत मंजूर झालेले असून सुद्धा लाभ मिळत नाही .
तरी वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी देऊन घरकुलचे लाभ द्यावे व अन्य लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ मिळावे.
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 बुधवार पेठ परिसरातील मिलिंद नगर ,जय मल्हार चौक व जुना कारंबा नाका या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबत असल्याने पावसाळ्यापूर्वी विविध कामे अत्यंत तातडीने करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी पावसाचे पाणी थांबून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही यानिमित्त विविध ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर नादुरुस्त ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याबाबत तसेच विविध ठिकाणी ड्रेनेज मेनहॉल मधील गाळ काढणे बाबत संबंधितास आदेश होणे संदर्भात म.न.पा. आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष आनंद( दादा) चंदनशिवे, सो.म.पा.मा.नगरसेवक गणेश पुजारी, धम्मपाल मैंदर्गीकर इत्यादी उपस्थित होते




No comments:
Post a Comment