Recent Tube

Breaking

Tuesday, May 20, 2025

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर आणखी एक जबाबदारी




आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर आणखी एक जबाबदारी



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



महाराष्ट्र राज्य  पंचायतराज समितीवरती लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्याने सोलापुर जिल्ह्यासह सांगोला विधानसभा मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कामकाजावर विधिमंडळाचे नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची अशी हि पंचायत राज समिती आसुन या समीती मध्ये २५ सदस्य संख्या असुन  २८८ विधानसभा आमदारातुन २० सदस्य व विधानपरिषद आमदारातुन  ५ सदस्यांची  निवड केली  जाते.

 जिल्हा परीषदांना  वेगवेगळ्या योजना व कार्यक्रम राबण्यासाठी विकास निधी दिला‌ जातो.त्या विकास निधीचे योग्या त्या प्रकारे विनियोग  होतो की नाही या‌वरती लक्ष ठेवण्यासाठी पंचायत राज समितीचे महत्वपुर्ण काम आहे.

पंचायत राज समितीच्या बैठका या गुप्त पणे भरवणे बंधनकारक‌ आसुन.पंचाय राज समितीचे कामकाज गोपनिय आसते.पंचायत राज समितीचा एखादा अहवाल जो‌पर्यंत  सभागृहात मांडत नाहीत तो पर्यंत तो अहवाल उघड करता येत नाही.या बाबत  सभागृहात सुध्दा एखाद्या सदस्याला‌ प्रश्न उपस्थित करता येत नाही.

  आशी  ही महाराष्ट्र सरकारची महत्वपुर्ण पंचायत राज समिती आसुन त्यावरती आमादर डाॅ.बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्याने‌ सांगोला मतदार संघासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आसल्याचे मत शेकापक्षाचे‌ प्रसिध्दी प्रमुख  भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment