जवळा गावातून हद्दपार होणार कागदी चहाचा कप - सरपंच मा सज्जन मागाडे.
तालुका प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण निर्णय लोकांच्या जीवाशी खेळणारा कागदी चहाचा कप आता हद्दपार होणार.
मा सरपंच श्री. सज्जन मागाडे, उपसरपंच श्री. नवाज खलिफा, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल सुतार व गावातील सर्वच चहा व्यवसायिक यांचे सोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यामध्ये चहासाठी वापरला जाणारा कागदी कप हा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने त्याच्या दुष्परिणामामुळे कर्करोगासारखा महाभयानक आजार होऊ शकतो. यामुळे 31 मार्चनंतर गावामध्ये कोणत्याही चहा व्यवसायकाने किंवा हॉटेल मालकाने अशा प्रकारच्या कपामधून चहा विक्री केल्यास किंवा आढळून आल्यास तात्काळ 5000/- रुपयांचा दंड करण्याचे सर्वानुमते ठरले.
तसेच सरपंचांनी सर्वच नागरिकांना आवाहन केले आहे की, आपण चहा व्यवसायकांकडून काचेच्या ग्लास मधून किंवा कप-बशी मधूनच चहाची मागणी करा.
कागदी कपाचा अट्टाहास सोडा. आपले आरोग्य, हीच आमची जबाबदारी.
या निर्णयाचे सर्वच स्तरामधून जवळा गावचे सरपंच मा सज्जन मागाडे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.



No comments:
Post a Comment