स्वयम शिक्षण प्रयोग व्यवसाय उद्योगी महिलांचा स्वाभिमान संवाद मेळावा संपन्न.
पंढरपूर /प्रतिनिधी स्वयम शिक्षण प्रयोग अंतर्गत स्वाभिमान प्रकल्प राबवून महिलांना दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये विविध व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात आले.
त्या अनुषंगाने स्वयं शिक्षण प्रयोग स्वाभिमान व्यावसायिक उद्योगी महिलांचा संवाद मेळावा दिनांक 17 मार्च रोजी पंढरपूर येथील सोलापूर तीरे रोडवरील भगीरथी सेवा आश्रम येथे घेण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुण्यांकडून महिलांना आपापल्याला ज्या व्यवसायामध्ये रुची आहे.तो व्यवसाय निवडून कमी भांडवलामध्ये तो सुरुवातीपासून प्रगतीपथावर कसा नेता येईल यावरती मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये आसपासच्या परिसराचा तालुक्याचा जिल्ह्याचा अभ्यास करून व्यवसाय कसा निवडावा त्याची भाग भांडवल मार्केटिंग व्यवसाय संबंधी आधी मार्गदर्शक करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या मेळाव्यामध्ये दहा दिवस प्रशिक्षण घेतलेल्या गावातील सर्व महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. कोर्टी, पुळुजवाडी,शंकरगाव,तावशी, वाडी कुरवली, तुंगत,वाखरी या गावाच्या प्रशिक्षण घेतलेल्या सर्व 417 महिला उपस्थित होत्या.
मेळाव्यामध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी ,व्यवसायिक स्टॉल ची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमधील निवडण्यात आलेल्या क्रमांकाने एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने त्यांचे क्रमांक निवडून त्यांना बक्षीस देण्यात आले.
प्रशिक्षित महिलांना दहा दिवस प्रशिक्षण घेतलेले त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात आले .
उपस्थित मान्यवर स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेमार्फत आलेले लीलाताई जाधव,सुनिता पाटील, देवकन्या जगदाळे, अनुराधा गायकवाड उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कायदे सल्लागार हनुमंत दुधाळ , वृत्तपत्र अमर कांबळे, संपादक तथा मानवाधिकार संघटना सदस्य राहुल गायकवाड उपस्थित होते.
सखी रजनी कुंचे , नीलम जाधव, अन्नपूर्णा प्रक्षाळे , दमयंती वाघमारे , नवाजवी इनामदार प्रवीना वाघमारे , मोनाली कोळी , दिपाली कोळी ,निकिता साठे , इत्यादी सखी ताई या संवाद मिळावा मध्ये उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्याचे तालुका समन्वयक विशाल तायडे,सुशील शिंदे हे या मेळाव्याचे आयोजन करते होते. महिला सक्षमीकरण करण्याकरिता संतोष मस्के, संदेश कदम आधी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment