Recent Tube

Breaking

Monday, March 3, 2025

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू.



आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू. 


सांगोला प्रतिनिधी : टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे तसेच पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समिती च्या बैठकीत आक्रमक पणे केलेली होती.

आ.डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीला यश आले असून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले असून मायबाप शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहे.  

त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय आ.डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment