वाढेगाव येथील नवजात बालकावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील नवजात बालकाला ऑक्सीजन (व्हेंटिलेटर )प्रक्रिया करून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आलदर हॉस्पिटल येथे मोफत उपचार करण्यात आले.
जन्मानंतर हे बाळ रडले न्हवते त्यामुळे पालकांनी या नवजात बालकाला आलदर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.त्यानंतर त्याच्यावर कृत्रिम ऑक्सीजन (व्हेंटिलेटर ) लावून यशस्वी उपचार करण्यात आले.
डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला. नातेवाईकांना औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत व उत्तम देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.
तरी सर्व गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment