राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या वतीने विनम्र अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे ग्रामपंचायत मध्ये अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 23/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस वाकी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल हंबीरराव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी युवा नेते संजय गवळी, विनोद शिंदे, अनिल गवळी, महेश लिगाडे, प्रशांत गवळी, तेजस गवळी, आदिनाथ परीट, वरून गवळी, अनिल चव्हाण व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:
Post a Comment