महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ यांचा आरपीआयचे नेते अरुण अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या नूतन अध्यक्षपदी दिपक होवाळ यांची निवड झाल्याबद्दल.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्ह्याचे नेते मा अरुण अण्णा बनसोडे यांच्या वतीने बौद्ध विहार सांगोला.
येथे शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता दिपक होवाळ यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ यांचा सत्कार करताना विनोद उबाळे, पोपट तोरणे, गुणवंत जगधने,चंद्रकांत मोरे, वसंत होवाळ, समाधान होवाळ, समाधान गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या



No comments:
Post a Comment