Recent Tube

Breaking

Friday, January 31, 2025

माणगंगा बँकेच्या आवर्तन ठेव योजनेचा शुभारंभ संपन्न.



माणगंगा बँकेच्या आवर्तन ठेव योजनेचा शुभारंभ संपन्न.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील माणगंगा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने माणगंगा आवर्तन ठेव योजनेचा शुभारंभ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडला.

या योजनेमध्ये सभासद 12 हप्ते भरतील आणि संस्था 13 वा हप्ता भरून मिळणारी रक्कम सभासदास देईल.

ही योजना सभासदांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. असा विश्वास संस्थेचे संस्थापक श्री नितीन (आबासाहेब) इंगोले  यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हा चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगोले, विजय वाघमोडे, विवेक घाडगे, अरुण सुरवसे, खातेदार दिलीप घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंडे, व सर्व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

या योजनेचा शुभारंभ करताना उपस्थितांना योजनेचे महत्त्व आणि फायदे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment