Recent Tube

Breaking

Sunday, September 15, 2024

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास प्रसुतीचा पूर्ण खर्च होणार माफ.



खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास प्रसुतीचा पूर्ण खर्च होणार माफ.

  


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



ना घोषणा ना जीआर थेट अंमलबजावणी, मुलगी जन्मल्यास प्रसूतीचा खर्च पूर्ण माफ. 


 बेटी बचाव बेटी पढाओ मुलगी वाचवा देश वाचवा असा प्रसिद्ध आणि शासन आणि अनेक संघटना करत आहे मात्र ना घोषणा ना जीआर याची प्रत्यक्षात थेट अंमलबजावणी सांगोल्यातील  डॉ परेश खंडागळे व डॉ स्वाती खंडागळे खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला येथे होत आहे.

मुलगी जन्माला आल्यानंतर नॉर्मल प्रसूतीसाठी येणारा दवाखान्याचा खर्च पूर्ण माफ करून खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे आणि याचे कौतुक देखील सर्व स्तरातून होत आहे.

 मुलाप्रमाणे  मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

कन्यारत्न जन्मल्यास नॉर्मल डिलिव्हरी चे हॉस्पिटल बिल पूर्ण माफ करणार आहे व सिजेरियन झाल्यास हॉस्पिटल बिलामध्ये सवलत देण्यात येईल अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रमुख डॉ परेश खंडागळे यांनी दिली आहे.

हा उपक्रम अमर्यादित काळासाठी चालू राहणार आहे  सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांनी या अनोख्या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ परेश खंडागळे व डॉ स्वाती खंडागळे  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment