Recent Tube

Breaking

Friday, August 23, 2024

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आलदर हॉस्पिटल मध्ये सुरू.



महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आलदर हॉस्पिटल मध्ये सुरू.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील आरोग्य सेवेमध्ये नामांकित असलेले आलदर हॉस्पिटल मध्ये आज पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ.महावीर आलदर यांनी दिली.

या योजनेमध्ये सर्जरी विभागातून लघवी व मूत्रपिंड यावरील शस्त्रक्रिया, आतड्यावरील शस्त्रक्रिया, जन्मता व्यंग / दोष यावर शस्त्रक्रिया व इतर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, नवजात शिशु व अतिदक्षता विभागामध्ये कमी दिवसाचे बाळ, निमोनिया, कावीळ वाढली असल्यास, बाळाला सतत झटके येत असल्यास, कमी वजनाचे बाळ, जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभागामध्ये फिट झटके येणे, निमोनिया, सर्पदंश, बाल दमा, डेंग्यू, मलेरिया, टायफड व इतर आजारांवर मोफत उपचार केले जातात.

सदरची योजना ही पांढरे, केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी मोफत योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक व जन्माचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहे. तरी गरजूंनी सांगोला शहरातील रेल्वे स्टेशन समोर एरंडे कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या आलदर हॉस्पिटल मध्ये येऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ महावीर आलदर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment