शिवसेना तालुका उपाध्यक्षपदी मा संतोष रोकडे यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक व वाकी शिवणे गावचे सुपुत्र संतोष रोकडे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी शिवसेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सांगोला विधानसभा पक्षनिरीक्षक विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संतोष रोकडे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संतोष रोकडे यांची निवड करण्यात आल्याने संतोष रोकडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे


No comments:
Post a Comment