Recent Tube

Breaking

Wednesday, August 14, 2024

महूद येथील अनया पळसे हिचे प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यश



महूद येथील अनया पळसे हिचे प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यश 


प्रसन्न फाउंडेशन कडून  दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मान


महूद/ प्रतिनिधी महूद (ता.सांगोला)येथील कु.अनया प्रमोद पळसे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध  परीक्षेमध्ये राज्यामध्ये चौथा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.तसेच राज्यस्तरीय अभिरुप ए टी.एस. परीक्षेमध्येही तिने यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिला नुकताच प्रसन्न फाउंडेशन कडून  दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितल देवी धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे, उपसंचालक अनिल माने, वैद्यकीय डॉ. पांडुरंग नलवडे, जगदीश ओहोल, बालाजी जाधव, नवनाथ धांडोरे,प्रिया तोरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment