कै तुकाराम विठोबा आलदर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
वाकी शिवणे येथील कै तुकाराम विठोबा आलदर यांच्या पंचम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नरळेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.
यामध्ये सोमवार दिनांक 3/ 6/ 2024 रोजी सकाळी 8 वाजता कै तुकाराम विठोबा आलदर यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच श्रीमती पार्वती आलदर,मा शरद आलदर, मा काशिलिंग आलदर यांच्या हस्ते करण्यात आले व अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली होती.
या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केले रक्तदान केलेल्या युवकांना पाण्याचा जार व टिफिन बॉक्स भेटवस्तू म्हणून देण्यात आला व तसेच सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नातेवाईक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment