सांगोला भिमनगर येथील रामचंद्र कांबळे यांचे निधन.
रणसंग्राम न्यूज संपादन नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे नेते सुनील उर्फ लकी कांबळे यांचे वडील रामचंद्र सटवा कांबळे यांचे रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी पहाटे 4.30 वाजता सांगोला भीमनगर येथे त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
रामचंद्र सटवा कांबळे यांचा अंत्यविधी त्यांचे मुळगाव पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील स्मशानभूमीत करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी तपकिरी शेटफळ स्मशानभूमीत मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. असे त्यांच्या नातेवाईका कडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment