Recent Tube

Breaking

Tuesday, May 28, 2024

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन.



दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील नामवंत दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी पासून सांगोला मंगळवेढा पंढरपूर जत आटपाडी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत मूत्ररोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जय भवानी चौक सांगोला येथे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे त्या रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यामार्फत सुपर स्पेशालिटी मूत्ररोग तज्ञ डॉ चेतन शहा यांच्यामार्फत मोफत करण्यात येणार आहे.

तरी या मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचा गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ शिवराज भोसले, डॉ प्रवीण पैलवान, डॉ अण्णासो लवटे, डॉ निरंजन केदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment