Recent Tube

Breaking

Monday, May 20, 2024

सांगोला तहसील कार्यालया समोर पिण्याच्या पाण्यासाठी धायटी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.



सांगोला तहसील कार्यालया समोर पिण्याच्या पाण्यासाठी धायटी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील धायटी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई चालू असल्यामुळे धायटी ग्रामपंचायत च्या वतीने पिण्याचे पाण्याचे टँकर चालू करण्यासाठी वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी कायदेशीर मागणी करूनही दखल न घेतल्यामुळे सांगोला तहसील कार्यालयासमोर धायटी ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु त्यांना सांगोल्याचे तहसीलदार मा कणसे साहेब यांच्याकडून पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. 



यावेळी या उपोषणामध्ये धायटी गावचे सरपंच नवनाथ येडगे माजी सरपंच मोहन गेळे कबीर किर्थके सत्यवान जगदाळे विकास गेळे इत्यादी उपस्थित होते या उपोषणास पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख तुषार इंगळे व धनगर समाजसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बिरुदेव शिंगडे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

No comments:

Post a Comment