वाकी शिवणे येथे श्री सत्य साई सेवा संघटनेच्या वतीने पाणपोईचे उद्घघाटन संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात एसटी स्टँड समोर बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी दहा वाजता श्री सत्य साई सेवा संघटनेच्या वतीने पाणपोईचे उद्घघाटन माजी उपसरपंच महादेव घाडगे माजी पोलीस पाटील साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या पाणपोईच्या उद्घघाटनास वाकी गावचे सरपंच अनिल हंबीरराव, माजी सभापती बाळासाहेब काटकर, प्राध्यापक मधुकर गाडे, माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग पवार, माजी व्हाईस चेअरमन अभिमान होवाळ, विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी कुंभार, मच्छिंद्र जाधव, बापूसाहेब होवाळ, मोहन भुसे, उमेश मोहिते, रमेश गेजगे, बाबासो चोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या पाणपोईचे नियोजन श्री सत्य साई सेवा संघटनेचे राहुल होवाळ व संपत वाघाटे यांनी केले आहे. या पाणपोईमुळे वाकी गावातील नागरिकाकडून राहुल होवाळ यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


No comments:
Post a Comment