Recent Tube

Breaking

Thursday, April 18, 2024

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांची भीमशक्ती संघटनेच्या कार्यालयास भेट.



वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांची भीमशक्ती संघटनेच्या कार्यालयास भेट.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



माढा लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांची भीमशक्ती संघटनेच्या सांगोला येथील कार्यालयास बुधवार दिनांक 17/4/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता सदिच्छा भेट दिली. 


भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय (बापू)बनसोडे यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माढा लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात विविध विषयावरती महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांच्यामध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा झाली.

यावेळी भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष साठे व तालुक्यातील भिमशक्ती संघटनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे यांच्या सांगोल्यातील कार्यालयास वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभेचे उमेदवार रमेश बारसकर यांनी भेट दिल्यामुळे तालुक्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment