Recent Tube

Breaking

Monday, March 25, 2024

जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत पाटील बागल वस्ती हलदहिवडी शाळेचा द्वितीय क्रमांक



जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत पाटील बागल वस्ती हलदहिवडी शाळेचा द्वितीय क्रमांक


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सोलापूर येथे दिनांक 21 मार्च 2024 रोजी कुचन प्रशालेमध्ये  झालेल्या जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील बागल वस्ती (हलदहिवडी) या शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे ही शाळा मागील तीन वर्षापासून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नंबर मिळवत आहे

 मागील वर्षी या शाळेने जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्या अगोदर सुद्धा याच शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला होता आणि आता पुन्हा द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 

सदर स्पर्धेमध्ये सहा मुले व सहा मुली सहभागी होत्या. मुलांमध्ये अथर्व झुरे ,करण फाळके, संजय फाळके, सार्थक चव्हाण ,माऊली चव्हाण, शचीनंदन ढेकळे आणि मुलींमध्ये श्रेया माने ,रोशनी जाधव ,स्वरांजली जाधव, दीक्षा चव्हाण ,गायत्री लेंडवे, स्वराली चव्हाण यांनी सहभाग नोंदविला तसेच या गीतासाठी हार्मोनियम वादक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक समाधान ढेकळे सर तसेच ढोलकी वादक सिद्धनाथ पारसे आणि खंजिरी वादक रणवीर गायकवाड यांचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment