न्यू इंग्लिश स्कूल जुनि .कॉलेज सांगोला मध्ये जागतिक वन दिन साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
न्यू इंग्लिश स्कूल जुनि . कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक वनीकरण सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन साजरा करण्यात आला .यावेळी सामाजिक वनीकरण विभाग सांगोल्याचे वनपाल श्री पी ए क्षीरसागर वनरक्षक श्री एम बी मुंडकर वनरक्षक श्रीमती के एस बडूरे वनसेवक श्री अनिल शिवशरण हे उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्री केशव माने सर होते .यावेळी एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा . श्री संतोष राजगुरु प्रा .श्री कामाजी नायकुडे उपस्थित होते .यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक वनीकरण विभागाचे श्री . पी ए क्षीरसागर यांनी पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर आपलीअन्नसाखळी व्यवस्थितअसली पाहिजे . प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे .
आपण पर्यावरणात असणारे वेगवेगळे पक्षी प्राणी यांना संरक्षण दिले पाहिजे .तसेच त्यांचे जतन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे . पर्यावरणाचे संवर्धन करत असताना तसेच त्याचा मानवी जीवनावरती होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी वनाचे महत्त्व पटवून सांगितले . त्याचबरोबर जगण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी . पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे .वनसंवर्धन प्राणी संवर्धन आणि जलसंवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत मांडले .
यानंतर वनरक्षक श्रीमती के एस बडुरे मॅडम यांनी पर्यावरणातून लाख मोल किमतीचा ऑक्सिजन आपल्याला मिळतो .त्यामुळे आपल्याला वृक्षाचे महत्व जाणून घेऊन वृक्षांची लागवड केली पाहिजे .तसेच त्याचे संगोपन केले पाहिजे आणि निसर्गाप्रती कृतज्ञते ची भावना ठेवली पाहिजे असे सांगितले .यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य श्री केशव माने सर यांनी जर मानवाने निसर्गामध्ये अतिक्रमण केले नसते तर असे दिन साजरा करण्याची गरज भासली नसती .
त्यामुळे जर आपल्याला निरोगी जीवन जगायचे असेल पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वेळीच जागृत होऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा श्री संतोष राजगुरू यांनी केले .सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा सौ . जुलेखा मुलाणी यांनी केले.




No comments:
Post a Comment