वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवार दिनांक 23/ 2/ 2024 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यासाठी सरपंच अनिल हंबीरराव, माजी सरपंच श्रीमती पार्वती आलदर, ग्रामसेवक राजकुमार ताटे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव, अतुल गवळी, धनाजी विभुते, संजय गवळी, तुकाराम मोहिते, काशिलिंग आलदर, आबा गाडे, वरून गवळी, समाधान होवाळ, तेजस गवळी
व ग्रामपंचायत कर्मचारी सारिका पलसे, अनिल चव्हाण, काशिलिंग वाळखिंडे, हरिदास पवार इत्यादी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment