वाकी शिवणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते
यामध्ये रविवार दिनांक 25 2 2024 रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मराठा समाजाच्या युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या रक्तदान केलेल्या युवकांना जार भेट वस्तू म्हणून देण्यात आला. व तसेच सोमवार दिनांक 26/ 2/ 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या रेकॉर्ड स्पर्धेत
प्रथम क्रमांक ओंकार ग्रुप ---कोल्हापूरचे तन कला मंच ---तासगाव,
दुतीय क्रमांक ऋत्विक निकम--- रत्नागिरी
गजानन शिंदे --- सलगर,
तृतीय क्रमांक डी डी एस ग्रुप --सांगोला
मास्टर देवराज--- कराड,
चतुर्थ क्रमांक अनिल झेंडे
अनुष्का भंडारे,
यांना विभागून नंबर देण्यात आले व तसेच मंगळवार दिनांक 27/ 2/ 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता वाकी गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साही वातावरणात काढण्यात आली. या मिरवणुकी मध्ये धैर्यशील मोहिते पाटील व गुंडा खटकाळे यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी या मिरवणुकीस सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


No comments:
Post a Comment