काँग्रेसच्या माळशिरस विधानसभा निरीक्षकपदी अभिषेक कांबळे यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
लोकसभा निवडणूकीच्या आनुषंगाने इडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी काल महाराष्ट्रातील 252 विधानसभा निहाय काँग्रेस पक्ष निरीक्षक नेमण्यात आले.
यामध्ये जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू व सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक कांबळे यांची माळशिरस विधानसभा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी अभिषेक कांबळे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले व जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले माळशिरस विधानसभा राखीव मतदारसंघ असुन माढा लोकसभा मतदारसंघात अत्यंत प्रभाव टाकणारा मतदारसंघ आहे.


No comments:
Post a Comment