लोकांशी बांधिलकी असेल तर जनता तुमच्या पाठीशी राहते - महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे.
मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या जन्मदिनी विविध सामाजिक उपक्रम
सांगोला : तालुका प्रतिनिधी
दीपकआबांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेवून कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दीपकआबा आणि शहाजीबापू यांचे पक्ष व राजकारण वेगवेगळे असले तरी दोघांनी मैत्री जपली आहे. महायुतीच्या सरकारने यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेष तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. बचत गटातील उत्पादित मालाची विक्री होण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकांसोबत बांधिलकी असेल तर जनता तुमच्या पाठीशी राहत असते असे मत महिला व बालविकास मंत्री ना.आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश लंके, आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, प्रा. पी. सी. झपके, समाधान काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, डॉ.पियूष साळुंखे-पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अनिलनाना खटकाळे, सचिन लोखंडे, सूर्याजी खटकाळे, दादासाहेब लवटे, अक्षय भांड, अभिषेक आव्हाड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रोजगार मेळावा, ब्लँकेट वाटप, साडी वाटप, मुलींना सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, नेत्यांचा वाढदिवस कसा साजरा करावा हे दीपकआबांच्या कार्यकर्त्यांकडून शिकावे. राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. ५० हून अधिक कंपन्यांना बोलावून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दीपकआबांनी प्रयत्न केला आहे. दीपकआबांच्या कार्यकर्त्यांनी सायकल वाटप, शिलाई मशीन, २५ हजारांहून अधिक महिलांना साडी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शहाजीबापू आणि दीपकआबा म्हणजे शोले चित्रपटातील जय विरुची जोडी असल्याचे आ निलेश लंके यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा म्हणाले की, गेल्या चार वर्षांत विकास कामांना गती मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमची युती झाली आणि तीच युती पुन्हा राज्यात अस्तित्वात आली. सांगोला जे ठरवेल तेच राज्यात घडत असतं, हे संपूर्ण राज्याने पाहीलं आहे. कोणीही भ्रमात राहू नये आमच्या दोघांपैकी एकच आमदार असणार आहे असे दीपकआबांनी सांगितले.
चौकट
१) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहर आणि तालुक्यात भव्य रोजगार मेळावा महिलांना शिलाई मशिन वाटप शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप गरीब व गरजू महिलांना हजारो साड्यांचे वाटप तसेच शहर आणि परिसरात हजारो ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अन्नदान करून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा दिल्या.
२) कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
गेली ३० ते ३५ वर्षे मी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहे कार्यकर्ता हीच माझी खरी ताकद आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी रोजगार मेळावा महिलांना शिलाई मशीन वाटप मुलींना सायकल वाटप तसेच तालुका भर अन्नदान विविध क्रीडा स्पर्धा यासारखे सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्य केले आहे. या सर्वांचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने कार्यकर्त्यानी माझा वाढदिवस साजरा केला त्या पडद्या मागून सतत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही ; मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर


No comments:
Post a Comment