न्यू इंग्लिश स्कूल ,जुनि . कॉलेज सांगोला ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न.
दि.6 जानेवारी रोजी रात्री १ . ००वा .जय भवानी जय शिवाजी . गणपती बाप्पा मोरया या घोषणा देत न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज सांगोला च्या प्रमुख प्रवेशद्वारासमोरून सहलीची सुरुवात झाली. : सुरुवातीला कृष्णा नदीच्याकाठावर वसलेल्या वाई या ठिकाणाला भेट देऊन तेथील पुरातन मंदिरातील गणपतीचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर पाचगणी टेबल लँड पाहण्यात आला .उंच असे डोंगर गर्द हिरवीगार झाडी आणि त्यातून उगवत्या सूर्याचे लालबूंद असे प्रतिबिंब पाहताना मन उल्हासित होत होते .यानंतर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेले थंड हवेचे पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये पोहोचून तेथील सरस्वती पॉईंट . इको पॉईंट . मंकी पॉईंट आर्थरसीट पॉईट टायगर स्प्रींग पाँइट पाहून झाल्यानंतर भगवान शिवाला समर्पित असणारे जुन्या महाबळेश्वर मधील प्राचीन मंदिराला भेट दिली .याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेची सुवर्ण तुला केली होती . यानंतर 4500 हजार वर्षापूवीचे पंचगंगा मंदिर पाहीले . कृष्णा 'वेण्णा ' गायत्री, सावित्री कोयना याचबरोबर भागिरथी व सरसवती या नद्यांचा उगम पाहिला याठिकाणी दुपारचे भोजन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा सहसा चा साक्षीदार म्हणून ओळखला जाणारा प्रतापगड पाहण्यासाठी रवाना झालो .गडावर तटबंदी मुख्य किल्ला बालेकिल्ला भवानी मंदिर कडेलोट पॉईंट नगारखाना हस्तकला प्रदर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहत असताना मनामध्ये वेगळीच चेतना निर्माण होत होती .यानंतर पोलादपूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड पाहण्यासाठी रवाना झालो रायगडावर राणी महाल मेना दरवाजा पालखी दरवाजा ' दरबार हॉल धान्याचे कोठार अष्टप्रधान मंडळ कार्यालय खलबत्तखाना टांकसाळ दरबार हॉल होळीचा माळ बाजारपेठ जगदीशेश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी इत्यादी ठिकाणांची माहिती गाईड कडून घेण्यात आली .ही माहिती ऐकत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अधिक कुतूहल व उत्सुकता निर्माण होत होती .
यानंतर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी पिण्याचे पाणी खुले व्हावे याच्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला ते चवदार तळे पाहण्यात आले .रामदासांनी अध्यात्माचा सार सांगणारा जो दासबोध ग्रंथ लिहिला ते ठिकाण शिवतरघळ पाहण्यात आले त्या ठिकाणची निसर्गाची किमया अद्भुत्व आनंद वाटणारे आहे तसेच तेथील निसर्गातील सुंदरता वातावरण पाहून मन सुखावून जात होते दुसऱ्या दिवशी म्हसळा या ठिकाणी मुक्काम करण्यात आला . निसर्गरम्य परिसरामधील गायत्री व सावित्री नद्यांच्या संगम स्थानी असलेले अति प्राचीन पेशव्यांचे कुलदैवत असणारे श्रीक्षेत्र हरीहरेश्वर या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन तेथेच असलेल्या अरबी समुद्राच्या विहंगम लाटांचे दृश्य डोळ्यात साठत होते . अशा या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेल्या अनेक वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत एक आकर्षक अभेद्य शेवटपर्यंत अजिंक्य असा किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा तो पाहण्यासाठी दीड किलोमीटर बोटीचा प्रवास करून किल्ल्यावर पोहोचलो . किल्ल्यावर गणपती मंदिर .मशीद त्या ठिकाणी असणारे बुरुज भक्कम तटबंदी भुयारी मार्ग महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची कलाल बांगडी ही तोफ याविषयीची माहिती घेण्यात आली त्याच बरोबर पद्मदुर्ग ची ही माहिती घेण्यात आली हे सर्व पाहून झाल्यानंतर आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली महाबळेश्वर मध्ये मार्केटिंग करून कोणत्याही अडथळ्याविना अतिशय आनंदात उत्साहात सुखरूप सुरक्षितपणे मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता कॉलेजवर ही सहल पोहोचली . या सहलीच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष .सचिव सर्व पदाधिकारी ' कॉलेजचे प्राचार्य 'श्री हेमंतकुमार आदलिंगे .उपप्राचार्य श्री केशव माने पर्यवेक्षक श्री संजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभाग प्रमुख प्रा . श्री संतोष राजगुरू प्रा . दीपक खटकाळे प्रा . मिलिंद पवार प्रा . दत्तात्रय देशमुख प्रा . कामाजी नायकुडे प्रा . संदीप भुसनर प्रा अमोल केदार प्रा .प्रकाश बाबर प्रा सौ जुलेखा मुलाणी प्रा .कु . सीमा कांबळे व सेवक सतीश आगवणे यांनी परिश्रम घेतले



No comments:
Post a Comment