Recent Tube

Breaking

Monday, January 15, 2024

आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल - डॉ बाबासाहेब देशमुख.



आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल - डॉ बाबासाहेब देशमुख.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सर्वसामान्य कार्यकर्त्याला हिशोब, गणित घालायला विद्यमान सांगोल्याचे आमदार माहिर आहेत. गेल्या तीन वर्षापासून आशा हिशोबावरच त्यांची गुजराण आहे. असे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राख रांगोळी केली आहे. त्यामुळे हिशोब गणित घालायच्या भानगडीत पडू नका. आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल या कडक शब्दात शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना इशारा दिला.

टेंभूच्या पाण्याचे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं. आमच्या नादाला लागू नका. या शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी मंत्री स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्यावर टीका करत. नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांना आव्हान दिले होते. या आव्हानाचा डॉ बाबासाहेब देशमुख यांनी खरपूस समाचार तर घेतलाच पण आमदार शहाजी बापू पाटील यांचा उभा आडवा इतिहासही चव्हाट्यावर मांडत त्यांच्या कारनाम्याचे वाभाडे काढले. 

डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले. कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहित आहे. स्वर्गीय आबासाहेबांनवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख होती. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका.पाण्यासारखे स्वच्छ निर्मळ जगात काहीच नाही. त्यामुळे पाण्यावर तुम्ही बोलणे म्हणजे पाण्याचा अपमान करण्यासारखी आहे. माण नदीचा तळ तुमच्याच बगलबच्चांनी गाठला आहे.

तुमच्या कोट्यावधी रुपयांच्या बंगल्याचे इमले हा तळ शोधूनच वाढले आहेत. त्यामुळे आपल्याच जलवाहिनीला उघडी बोडकी करून तिला पुन्हा वस्त्र नेसवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीने चार वर्षात तालुका रसातळाला नेल्याचा घनाघाती आरोप डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे. आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत. ते आम्ही प्राणपणाने जपून त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच पण त्यांच्या विचाराचा जागरही तूसभर ही कमी होऊ देणार नाही तुमचे संस्कार काढले तर पळता भुई थोडी होईल असा इशारा डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

No comments:

Post a Comment