सांगोला कारखान्याकडून पहिला हप्ता २७०० रुपये.
बारा वर्षे बंद कारखान्याचा पहिला हंगाम यशस्वी - अभिजित पाटील.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (धाराशिव युनिट क्रमांक चार) २०२३- २४ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला दोन हजार सातशे रुपये पहिला हप्ता देणार असल्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे.
बारा वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याने सुरू केला.कारखाना चालेल किंवा नाही, याबाबत सभासदांसह शेतकऱ्यांमध्येही उत्सुकता लागली होती.परंतु,अभिजित पाटील यांनी सांगोला कारखान्याचा पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला.आता २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांच्या उसाला २७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
ऊसदराच्या कोंडीमुळे राज्यात सध्या विविध आंदोलने सुरू आहेत.अभिजित पाटील यांनी पहिल्यांदा दोन हजार ५०० रुपयांचा दर जाहीर केला होता. ऊसदराची आंदोलने व शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर मिळावा यासाठी अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन सांगोला सहकारी साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला पहिला हप्ता दोन हजार ७०० रुपये प्रतिटन जाहीर केला आहे.गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याचा गळीत हंगाम गेल्या वर्षीपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
चौकट -
शेतकरी, कामगारांची साथ व नियोजन व्यवस्थित असेल तर तर कारखाने चालवणे कठीण जात जात नाहीत. बारा वर्षे बंद असलेल्या या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम यशस्वी पार पडल्याने आनंद होत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर कसा मिळेल, हेच उद्दिष्ट ठेवून सर्वांना सोबत घेऊन कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अभिजित पाटील,अध्यक्ष,डीव्हीपी उद्योग समूह


No comments:
Post a Comment