मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हलदहिवडी गावाच्या वतीने सांगोला अकलूज रोड वरती रास्ता रोको आंदोलन संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी गावातील सकल मराठा बांधवांच्या वतीने गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता हलदहिवडी चौकात सांगोला अकलूज रोड वरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.
या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी हालदहिवडी गावातील सकल मराठा समाजातील युवकांनी मुंडन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये वाकी शिवणे गावातील व हालदहिवडी गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनामध्ये मराठा युवकांनी "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं" "जय भवानी जय शिवाजी" अशा प्रकारच्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलनास सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन शिवणे सर्कल मा जाधव, व वाकी शिवणे गावच्या तलाठी कडलसकर यांनी स्वीकारले यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


No comments:
Post a Comment