वाकी शिवणे येथे मराठा समाजाच्या वतीने कँडल मार्च संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण चालू आहे.
या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे बुधवार दिनांक 1/11/ 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजता वाकी गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी युवकांनी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत संपूर्ण वाकी गावातून कँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने मराठा युवक सहभागी झाला होता हा कँडल मार्च शांततेत करण्यात आला.


No comments:
Post a Comment