Recent Tube

Breaking

Wednesday, October 25, 2023

सांगोला तहसील कार्यालयासमोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या दिवशी गाव पुढार्‍यांची मोठी गर्दी.



सांगोला तहसील कार्यालयासमोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या दिवशी गाव पुढार्‍यांची मोठी गर्दी.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील सावे वाढेगाव चिकमहुद व खवासपूर आशा एकूण चार ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अर्ज माघार बुधवारी घेण्यात आले. या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 42 पैकी 31 तर सदस्य पदासाठी 239 पैकी 127 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे 4 सरपंच पदाच्या जागेसाठी 11 तर 49 सदस्यपदाच्या जागेसाठी  110 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यामध्ये वाढेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत समोरील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक पाच मधून शोभा संभाजी वायदंडे बिनविरोध झाले आहेत.

सावे ग्रामपंचायतच्या छाननी प्रक्रिये नंतर एकूण सरपंच पदासाठी 10 तर सदस्य पदासाठी 45 उमेदवारी अर्ज होते यामधून 21 सदस्य तर 8 सरपंच पदाच्या उमेदवारांणी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे एकूण 1 सरपंच पदाच्या जागेसाठी 2 अर्ज तर 11 सदस्य पदाच्या जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात उभे आहे.

वाढेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिये नंतर एकूण सरपंच पदासाठी 3 तर सदस्य पदासाठी 39 उमेदवारी अर्ज होते. यामधून 1 सरपंच पदाच्या तर 11 सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे एकूण 1 सरपंच पदाच्या जागेसाठी 2 तर 12 सदस्य पदाच्या जागेसाठी 28 उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने शहाजीबापू पाटील व दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाच्या शोभा संभाजी वायदंडे या बिनविरोध झाल्या आहेत.

चिकमहुद ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर एकूण सरपंच पदासाठी 21 तर सदस्य पदासाठी 106 उमेदवारी अर्ज होते यामधून 18 सरपंच तर 70 सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे एकूण 1 सरपंच पदाच्या जागेसाठी 3 अर्ज तर 15 सदस्य पदाच्या जागेसाठी 36 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 

खवासपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर एकूण सरपंच पदासाठी 8 तर सदस्य पदासाठी 49 उमेदवारी अर्ज होते. यामधून 4 सरपंच पदाच्या उमेदवारांनी तर 36 सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे एकूण 1 सरपंच पदाच्या जागेसाठी 4 तर 11 सदस्य पदाच्या जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात उभे आहेत.

सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गाव स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उमेदवारासह गाव पुढार्‍याची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी तहसील कार्यालयासमोर होती.

No comments:

Post a Comment