Recent Tube

Breaking

Wednesday, October 25, 2023

केदार हॉस्पिटल येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर पंधरवडा.



केदार हॉस्पिटल येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर पंधरवडा. 



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614

 


सांगोला येथील वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे  मोफत मूत्ररोग निदान उपचार शस्त्रक्रिया शिबीर पंधरवडा याचे आयोजन केले आहे. दिनांक १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सांगली मधील मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ. तन्मय मेहता यांच्या सहकार्याने मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर  आयोजित केले गेले आहे. 

सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीवरील सूज, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार- लघवी वारंवार होणे, स्त्री व पुरुष यांच्या लघवीच्या मार्गातील अडथडे,लघवीच्या मार्गामध्ये पडदे तयार होणे,लघवी न होणे इ. आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.

या शिबिरासाठी जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन  यावे व मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.अण्णासो लवटे व फिजिशियन डॉ. निरंजन केदार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना मूत्ररोग संबंधातील शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना  महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांच्या माध्यमातून मूत्ररोग तज्ञ डॉ.तन्मय मेहता यांचेमार्फत दुर्बिणीद्वारे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच क्वांटा लेझर मशीन मुतखडा रुग्णांसाठी उपलब्ध  करण्यात आले  आहे .

सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सांगोला,मंगळवेढा, आटपाडी, जत,पंढरपूर तालुक्यातील  गोर-गरीब गरजू रुग्णांनी  खालील फोनवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा. 8484069005 , 9145124579

No comments:

Post a Comment