Recent Tube

Breaking

Saturday, October 21, 2023

आदर्श प्राथमिक विद्यालयात भोंडला कार्यक्रम उत्साहात साजरा.



आदर्श प्राथमिक विद्यालयात भोंडला कार्यक्रम उत्साहात साजरा.


रणसंग्राम न्यू संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614 


सांगोला आदर्श प्राथमिक विद्यालयात भोंडला कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला प्रारंभी सौ. शुभांगी राऊत ,सौ.अश्विनी कदम ,सौ.सुवर्णा सरगर यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. अश्विन पक्षात हस्त नक्षत्रात हा कार्यक्रम केला जातो. ऐलमा पैलमा ,कृष्ण घालितो लोळण, कारल्याचा वेल या गाण्यावर उपस्थित महिलांनी फेर धरला .यानंतर खिरापत ओळखण्याला बक्षिसे दिले गेले. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी आदर्श बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.रजनी पलसे ˈमॅडम,श्रीमती सुलेखा केदार ˈमॅडम,सौ.मयुरी नवले ˈमॅडम,सौ.अनिता माने ˈमॅडम,सौ.जयश्री वाघमोडे ˈमॅडम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment