Recent Tube

Breaking

Thursday, October 19, 2023

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गोडसे कुटुंबास पिको फॉल मशीन भेट.



आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गोडसे कुटुंबास पिको फॉल मशीन भेट.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 

सांगोला ( प्रतिनिधी )- पतीच्या अपघाती निधनानंतर प्रपंचाची जबाबदारी पार पडत असलेल्या श्रीमती अनुराधा विजय गोडसे यांना आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सूतगिरणीचे चेअरमन तथा आपुलकीचे सल्लागार डॉ. प्रभाकर माळी यांच्या हस्ते पिको फॉल मशीन भेट देण्यात आली.

         सांगोला येथील सूतगिरणीत नोकरीस असलेल्या विजय गोडसे यांचे काही महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी श्रीमती अनुराधा गोडसे यांच्यावर आली. तीन मुलांचा सांभाळ व त्यांचे शिक्षण त्या करत आहेत. या कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेत आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना गुरुवारी पिको फॉल मशीन भेट देण्यात आली.

          यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेशकाका चौगुले, अरविंद केदार, श्रीकांत देशपांडे, इंजि. विकास देशपांडे,डॉ. अनिल कांबळे, प्रा. डॉ. बबन गायकवाड, प्रा. डॉ. रमेश बुगड, राजेंद्र दिवटे, वसंत सुपेकर, अमर कुलकर्णी, दादा खडतरे आदी आपुलकी सदस्यांसह संजय सरगर,  मारुती गोडसे, डॉ. गणपत मिसाळ, विष्णू गोडसे, प्रथमेश यादव व गोडसे कुटुंबीय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment