न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे . यानिमित्त सांगोला नगरपालिका सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सांगोला शहरांमध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली होती.
सुरुवातीला सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.यावेळी न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री हेमंत आदलिंगे नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक स्वप्निल हाके शहर समन्वयक तेजश्री बगाडे एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा .संतोष राजगुरू व बहुसंख्य एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते .
यावेळी भाजी मंडई, नेहरू चौक शिवाजी चौक नगरपालिकेच्या समोरचा भाग ते महात्मा फुले चौकापर्यंत चा भाग हा स्वच्छ करण्यात आला .यावेळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हेमंत आदलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस प्रकल्पाधिकारी प्रा . संतोष राजगुरू कार्यक्रमाधिकारी प्रा .मिलिंद पवार व प्रा सौ जुलेखा मुलाणी यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment