न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवााळ मो नं 9112049614
न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला इयत्ता बारावी इतिहास विषया ची क्षेत्रभेट नरसोबावाडी पन्हाळा जोतिबा न्यू पॅलेस कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ महालक्ष्मी मंदिर रंकाळा या ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते .
मंगळवार दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे नरसोबावाडी कडे रवाना होऊन प्रथम कृष्णा आणि पंचगंगा नदीचा विहंगम असा संगम पाहून पवित्र असे दत्त मंदिराचे चे दर्शन घेऊन पन्हाळ्या ला गेलो . पन्हाळ्यावर गंगा यमुना सरस्वती धान्य कोठारे, सज्जा कोटी, आंधार बाव . तिन दरवाजा तटबंदी छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे ज्या पठारावरून गेले ते मसाई पठार व इतर इमारतीपाहत असताना ऐतिहासिक स्फूर्ती निर्माण होत होती .
सिद्धी जोहर ने दिलेला वेढा राजापूरच्या इंग्रजांकडून मारलेल्या तोफामधून दरवाजावर उडालेले छिलके आणि मावळा श्री शिवा काशीद प्रति शिवाजी म्हणून बोलणी करायला गेलेला प्रसंग गाईड सांगताना अंगावर शहारे येत होते . यानंतर ज्योतीबा चे दर्शन घेऊनऐतिहासिक ठेवा जपून ठेवलेल्या न्यू पॅलेस या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी असणारी वेगवेगळी शस्त्रास्त्रे . राजघराण्याच्या वंशावळीतून राजांचा इतिहास समजला .. छ शाहु महाराजांनी केलेल्या पशुपक्ष्यांच्या शिकारी . तेथील दरबार हॉल आसन व्यवस्था हे पाहण्यात आले . वस्तुसंग्रहालय पाहण्यासारखे आहे .
यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिवाजी विद्यापीठ मधील मुख्य इमारत . ग्रंथालय .मानव्य विद्या विभाग व इतिहास विभाग यांना भेटी देण्यात आल्या . पुरातन असे महालक्ष्मी मंदिर पाहुन रंकाळा पाहिला व परतीचा प्रवास सुरु केला . सुखरुप पणे कॉलेज वर पोहोचलो या क्षेत्रभेटी साठी प्राचार्य श्री हेमंतकुमार आदलिंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग प्रमुख प्रा . संतोष राजगुरू प्रा . प्रकाश बाबर प्रा . समाधान खिलारे प्रा सौ कुसुम जानकर प्रा . सौ उषा ढाळे श्री सतीश आगवणे यांनी परिश्रम घेतले .


No comments:
Post a Comment