Recent Tube

Breaking

Wednesday, September 13, 2023

सांगोला येथे ग्रामीण भागातील मुलींना सायकल वाटप करण्यात येणार.



सांगोला येथे ग्रामीण भागातील मुलींना सायकल वाटप करण्यात येणार.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला येथे ॲटलास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सी एफ टी आय मुंबई या संस्थांच्या सहकार्याने व अस्तित्व संस्थेच्या वतीने सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील गरीब व गरजू मुलींना दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता बंधन पॅलेस वाडेगाव रोड सांगोला येथे सी एस आर मॅनेजर ॲटलास कॉपको (इंडिया प्रा लि) चे मा श्री अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक मा श्री अनंत कुलकर्णी, सहारा इन्स्टिट्यूट अकलूजचे मा डॉ श्रद्धा जवंजाळ, चेअरमन रतनचंद शहा को ऑफ बँक मंगळवेढा मा श्री राहुल शहा, या मान्यवरांच्या शुभहस्ते सायकल वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा श्री बापूसाहेब ठोकळे, उपाध्यक्ष अस्तित्व संस्था अरुण कसबे, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अरविंद केदार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता टापरे, राजलक्ष्मी ऑरगॅनिक प्रा लि चे अजयसिंह इंगवले, सचिव अस्तित्व संस्था अॅड सुनिता धनवडे, सरपंच वाणीचिंचाळे सौ प्रियंका गडहिरे, माजी नगरसेविका सांगोला सौ सुनीता खडतरे, अस्तित्व संस्था सदस्य जितेंद्र जगधने हे राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष मा श्री शहाजी गडहिरे व प्रकल्प अधिकारी सी एफ टी आय मुंबई मा श्री अमित देशपांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment