सांगोला तहसील कार्यालयास कुमारी निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
कुमारी निलिमा सुधाकर चव्हाण मु पो ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दापोली येथून घरी जाण्यासाठी निघाली होती. ती तेथून बेपत्ता झाली व त्यानंतर दिनांक 1/ 8/ 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता दोभोळ खाडी येथे तिचा मृत्युंदेह मिळाला. या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा सर्व समाजाची शंका आहे.
त्यामुळे या मुलीच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी व्हावी व दोशी असणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीचे निवेदन सांगोला तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयास व सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी रामदास काळे,तानाजी खंडागळे, मनोज खंडागळे,राहूल काळे, नितीन काळे, विलास काळे, अमित काळे, ऋषिकेश काळे, दत्तात्रय काळे, महेश काळे, प्रतीक काळे, अमोल काशीद, संतोष जगताप, तानाजी खंडागळे, किसन खंडागळे, निलेश राऊत, ज्ञानेश्वर काळे, तुषार भुसे, प्रवीण मोहिते, सुशील गवळी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते


No comments:
Post a Comment