महूद बु येथे माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित व्याख्यान.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंती निमित्त बुधवार दिनांक 9/ 8 /2023 रोजी सायंकाळी 6 वाजता महुद बु येथे आबासाहेबांच्या संसदीय कामकाज या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणुन माजी मंञी प्रा लक्ष्मण ढोबळे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, व प्रमुख पाहुणे युवा नेते मा धैर्यशील भैया मोहिते पाटील व तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई दादाशेठ बाबर, पुरोगामी युवक संघटना तालुकाध्यक्ष भाई दीपक गोडसे हे राहणार आहेत.
तसेच गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजता महूद बु येथे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, शालेय विद्यार्थी व नागरिकांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. असे शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना महुद बु जिल्हा परिषद गटाच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


No comments:
Post a Comment