Recent Tube

Breaking

Saturday, August 5, 2023

सांगोला नगरपालिकेचे गटनेते आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त कडलास हायस्कूल ला पाणी फिल्टर भेट.




सांगोला नगरपालिकेचे गटनेते आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त कडलास हायस्कूल ला पाणी फिल्टर भेट..


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


संभाजी ब्रिगेड व प्रदीप मिसाळ पाटील मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम.


सांगोला नगर पालिकेचे गटनेते मा.आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त कडलास हायस्कूल कडलास या प्रशालेस विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिता यावे या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेड व प्रदीप मिसाळ पाटील मित्र परिवाराच्या वतीने RO फिल्टर भेट दिला.


संभाजी ब्रिगेड नेहमी असे जे नेते ,सामाजिक कार्यकर्ते चळवळींना पाठबळ देत असतात अशा दानशूर व्यक्तींच्या वाढदिसानिमित्त मदतीचे हात देत असते.यामुळेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.



या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील, कडलास गावचे सरपंच दिगंबर भजनावळे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजू शिंदे,मा.सैनिक धनाजी गायकवाड,हणमंत गायकवाड,संतोष दादा गायकवाड,शरद गायकवाड,शरद पवार,आकाश ठोकळे,सागर गायकवाड,संग्राम गायकवाड,सागर पाटील,पपू लेंडवे, अली मुलाणी,पिंटू खटकाळे,सुरजकुमार वाघमारे,अभिषेक सुरवसे,प्रवीण सुतार,श्याम भजनवळे,किरण ऐवळे,माऊली माने,अतुल खटकाळे,सौरभ गायकवाड,हेमंत लेडवे, प्रशालेचे मुख्याध्यापक डी.एस.गायकवाड,शहाजी पाटील सर,सर्व स्टाफ,कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी व संभाजी ब्रिगेडचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment