Recent Tube

Breaking

Monday, August 28, 2023

आ प्रणितीताई शिंदे यांना राजकुमार पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा.



आ प्रणितीताई शिंदे यांना राजकुमार पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा. 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मा. राजकुमार पवार .  यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.  यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष  सुरेश हसापुरे  व दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष  हरिश पाटील उपस्थित होते.

आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात उतरण्याचा प्रघात जगाच्या पाठीवर आहे. बर्‍याचदा पित्याच्या कर्तृत्वापुढं मुलांमुलीचे कर्तृत्व झाकोळून जाते. पण आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या बाबतीत अपवाद लागू पडतो. स्वकर्तुत्वाने सोलापुरसह, महाराष्ट्रातल्या कामगार, शेतकरी, कष्टकरी, अठरापगड जातींचे, सर्वसामान्य माणसांचे गेल्या २० वर्षापासुन जाई जुई विचार मंचच्या माध्यमातून सेवा करत, १५ वर्षापासून विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्राची जाण असणारे, स्वकर्तुत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे, कणखर, कृतीशील युवा नेतृत्व, काँग्रेस पक्षाची धगधगती तोफ मा. प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणितीताई शिंदे यांची निवड त्यांच्या भविष्यातील उज्वल राजकीय वाटचालीसाठी भेटून शुभेच्छा दिल्या. ज्याप्रमाणे हिमालयाच्या मदतीला सह्याद्रि धावला होता. त्याप्रमाणे सोलापुरपासून

महाराष्ट्राच्या सह्याद्रीपासून दिल्लीच्या तख्तापर्यंत प्रणितीताई आपण मजल मारावी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करावी अशीच इच्छा !!

No comments:

Post a Comment