वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांचे सर्व रोग निदान शिबिर संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्व पत्रकारांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी विठ्ठल काका देशपांडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आली.
या शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील पत्रकारांनी सहभाग घेऊन आपापल्या टेस्ट करून घेतल्या या शिबिरामध्ये ईसीजी, सीबीसी, रक्तातील साखर,बी पी इत्यादी टेस्ट करण्यात आल्या यावेळी डॉ परेश खंडागळे, सांगोल नगरपालिकेचे नगरसेवक सतीश सावंत, अरुण लिगाडे, नविदा पठाण, किशोर मम्हाणे, नितीन होवाळ, रविंद्र कांबळे, मोहसीन मुलाणी, संतोष साठे, मिनाज खतीब, सुरेश गंभीरे, शब्बीर मुलाणी व इतर तसेच वेदांत हॉस्पिटलचा सर्व स्टॉप उपस्थित होता.



No comments:
Post a Comment