Recent Tube

Breaking

Monday, July 3, 2023

भिम शक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संतोष साठे यांची निवड



भिम शक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संतोष साठे यांची निवड


सांगोला :- भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. विजय बापू बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी बैठक संपन्न व  नूतन सांगोला तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य मा. विजय बापू बनसोडे यांच्या शुभहस्ते व प्रमाणपत्र देऊन  सांगोला तालुका अध्यक्षपदी संतोष लक्ष्‍मण साठे व उपाध्यक्ष दिनेश नानासो धनवडे यांची निवड करण्यात आली तसेच 

महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे हे म्हणाले की सांगोला तालुक्यामध्ये होणारा अन्याय अत्याचार आमची संघटना कधीही सहन करणार नाही समाजातील शोषित पीडित वंचित बेरोजगार शेतकरी शेतमजूर अल्पसंख्यांक मागासवर्गीय वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम संघटना करत राहील असे संघटनेचे संस्थापक बनसोडे यांनी सांगितले.



सांगोला तालुक्यात पदाधिकारी यांच्या निवडी खालील प्रमाणे

 भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य नूतन सांगोला  तालुकाध्यक्षपदी मा. संतोष लक्ष्‍मण साठे उपाध्यक्षपदी अजित केरप्पा सूर्यगन व दिनेश नानासो धनवडे, विकास जालिंदर काटे, सचिवपदी प्रफुल लक्ष्मण उबाळे, सहसचिव नेताजी मसू गायकवाड, खजिनदार सुधाकर श्रीरंग जगधने, संपर्कप्रमुख सुनील लक्ष्मण भडकुंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत वैजनाथ गायकवाड, संघटक गणेश दिलीप बनसोडे, सदस्य निलेश प्रेमकुमार उबाळे, सदस्य सागर पोपट जावीर सदस्य युवराज रामचंद्र माने, सदस्य अतुल सिद्धार्थ होवाळ , मा. बबन किसन चव्हाण  भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली सर्व  व पदाधिकारी उपस्थितीत होते भीमशक्ती संघटनेचे काम करण्याची उद्दिष्टे 

१. नुतन तालुका कार्यकारणीची निवड करणे

2. संघटनेच्या ध्येय धोरणावर चर्चा करणे व निर्णय  घेणे

३. समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे व निर्णय घेणे.

४. बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर चर्चा करणे व निर्णय येथे

५. असंघटीत क्षेत्रातील कामगार यांच्या  प्रश्नांवर चर्चा करणे व निर्णय होणे.

६. विविध शासकिय समाजकल्याण कारी योजनांवर चर्चा करणे त्याविषयी समाजामध्ये जनजागृती करणे व राबविणे कामी सर्वोतोपरी प्रयत्न करणे.

७. विविध आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांविषयी चर्चा करणे व निर्णय घेणे.

वरील विषयावर चर्चा करून त्याची समाजामध्ये जनजागृती करून शासकीय सर्व योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम करण्याचा प्रयत्न करुन समाजातील अडचणी व शासकीय योजनेचा लाभ मिळत नसणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचे काम भिमशक्ती संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीन व शाहू फुले आंबेडकर चळवळीतील काम करत असताना भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य  कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबत प्रामाणिकपणाने काम करेन असे भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुकाध्यक्ष मा. संतोष साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तरी भीमशक्ती संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment