सांगोला येथील प्रथमेश यादव पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत उत्तीर्ण
सांगोला (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परिक्षेमध्ये अर्थशास्त्र या विषयात प्रथमेश राजेंद्र यादव याने पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवले आहे.
प्रथमेश यादव याचे माध्यमिक व १२ वी शास्त्र पर्यंतचे शिक्षण सांगोला विद्यामंदिर ज्यु. कॉलेज येथे झाले आहे. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. तर पदव्युत्तर शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून पूर्ण केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते प्रथमेश यादव यांचा फेटा शाल व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.


No comments:
Post a Comment