वाकी शिवणे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 9/ 6 /2023 रोजी सकाळी 10 वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस सांगोल्याचे तहसीलदार मा संजय खडतरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी या रक्तदान शिबिरास रक्तदान करण्यासाठी वाकी गावातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या रक्तदान शिबिरास मा. बाळासो काटकर, मा. कोंडीबा सिद, मा. नारायण काटकर, मा. नामदेव सिद, मा. पांडूरंग सिद, डॉ. रमेश सिद, मा. लक्ष्मण लेंगरे, मा. मोहन आलदर, मा. संतोष रोकडे, मा. मधुकर गाडे, मा. परमेश्वर खिलारे, मा. अनिल हंबीरराव, मा. काशिलींग आलदर, मा. आनंदा सरक, मा.पोपट लवटे, मा. तुकाराम सोनलकर, मा. संजय राजगुरु, आप्पा शेजाळ संतोष सोनलकर व असंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी सांगोल्याचे नूतन तहसीलदार संजय खडतरे यांचा फेटा शाल पुष्पहार घालून करून सत्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.


No comments:
Post a Comment